Posts

Showing posts from March, 2017

ये ना..... बापू राया - Ye Na BapuRaya

Image
ये ना..... बापू राया तू ये ना रे बापू राया कान झाले आतुर , बोल तुझे ऐकण्यासाठी  मन झाले व्याकुळ , तुला पाहण्यासाठी  तू ये रे घेऊन सोबत आईला तू ये रे घेऊन सोबत दादाला  ये ना.....  तुझ्याशिवाय आता नाही मन लागत नाही काही करमत मला  मनाचे हे डोळे असो बंद वा उघडे शोधात राहतात तुला  तू ये ना बापू  तू ये ना आई  तू ये ना दादा  ग तू ये ना आज्जी  ये ना..... बापू राया तू ये ना रे बापू राया || HARI OM || || SHREE RAM || || AMBADNYA ||

आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या - Ala Ha Bapu Amcha

Image
आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या  आनंद अमुचा हा भिडला गगनाला | डोळे भरुनी आले तुझ्या दर्शना अंग शहारले हे तुझ्या स्पंदना जय जगदंब जय दुर्गे जयघोष घुमला  पण एका गोष्टीचे दुःख वाटले  तुला काठी घेऊन चालताना पहिले  मग कळले आम्हास आम्ही तुला किती दुःख दिले  काळजी घेण्यास मग तुझी मोठ्या आईस विनविले ।। पण तरीही आम्हा भेटण्यास तुलाच राहवेना अंतर तुलाच सहावेना आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या  आनंद अमुचा हा भिडला गगनाला | || HARI OM || || SHREE RAM || || AMBADNYA ||

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती - Bhimrupi Maharudra Vajra Hanuman Maruti

Image
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वानरी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥   महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥   दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥   लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥   ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥   ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥   पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥   ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥   कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥   आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥  अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥   ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।